येथील पाठ्यपुस्तकातील बालकवी व जेष्ठ साहित्यीक
तथा सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांची श्रीरामपूर येथील दोस्ती फाउंडेशन द्वारे आयोजित लोककलावंत पै.मजनुभाई शेख स्मृती
प्रित्यर्थ आयोजित राज्यस्तरीय काव्यांजली कार्यक्रम व पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली असे या फाउंडेशन चे अध्यक्ष व या संमेलनाचे स्वागताध्यक्ष रज्जाक भाई शेख यांनी जाहीर केले आहे. सदरील कार्यक्रम येत्या रविवार(ता,२७)रोजी श्रीरामपूर येथे हॉटेल चंद्राणी,रेल्वे स्टेशन समोर सकाळी ९-३०ते सायंकाळी
४-३०वाजेपर्यंत चालणार आहे.या संमेलनाचे उदघाटक फ्रान्सिस संसारे आहे,तर पुरस्कार वितरण सेवा निवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे यांच्या हस्ते होणार आहे. कवी संमेलन रंजना महेंद्र बोरा यांच्या उपस्थितीत असणार आहे. आयोजक -स्वागताध्यक्ष रज्जाक भाई ,आनंदा साळवे ,मिराबक्ष बागवान, अमीनभाई शेख,सत्तारभाई,नितीन गायके, शैलेंद्र भणगे, देविदास बुधवंत,राजेंद्र देसाई,नसिर सय्यद,अमोल शिंदे,व दोस्ती फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे
आवाहन केले आहे,(फोटो कॅप्शन-श्रीरामपूर येथील कार्यक्रम अध्यक्षपदी धोंडीरामसिंह राजपूत यांची निवड)
No comments:
Post a Comment