वैजापूरच्या महिलांनी केला महिला मतदार जागृती चा संकल्प - Vaijapur News

Breaking

Wednesday, October 23, 2024

वैजापूरच्या महिलांनी केला महिला मतदार जागृती चा संकल्प

वैजापूर ता.२३
पुढील महिन्यातील २० नोव्हेम्बर ,बुधवार रोजी  राज्य- विधान सभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत महिलांची मतदान टक्केवारी वाढावी व महिलात मोठ्या प्रमाणात मतदान जागृती व्हावी म्हणून वैजापूरच्या महिलांनी,विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४अंतर्गत निवडणूक आयोगाच्या
" स्वीप"या अंतर्गत सुरू असलेल्या महिला मतदार जागृती अभियानात येथील श्री स्वामी समर्थ विद्यालयात आयोजित महिला मतदार जागृती मेळाव्यात जमलेल्या  शेकडो महिला मतदार भगिनींनी  जागृतीचा संकल्प नुकताच केला.या मेळाव्यात लोककलावंत  धोंडीरामसिंह राजपूत यांनी प्रति संत गाडगेबाबा च्या भूमिकेतून  महिला मतदारांशी संवाद साधून व मतदान करा, लोकशाही बळकट करा अशा गीतांना गाऊन महिलांना मतदानाचे महत्व विशद केले.  त्यांना सेवा निवृत्त मंडल अधिकारी अशोक आप्पा पवार यांनी सहायय केले.निवडणूक निर्णय अधिकारी डॉ .अरुण जऱ्हाड,सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार सुनील सावंत व पालिकेच्या प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ,संगीता नांदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर शहरातील  पालिकेच्या विद्यालयात महिला मतदार जागृती महिला मेळावे घेऊन मतदान जनजागृती पालिका शिक्षक करीत आहेत.
 पालिकेच्या श्री. स्वामी समर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश वसावे,पर्यवेक्षक एम,आर, गणवीर व शिक्षक सर्वश्री किशोर साळुंकर आर,के,खैरनार.आर,के सोमासे. डी,जे,खैरनार.जगदीश पाटील.सुभाष गोमलाडु,
संतोष शेलार,प्रमोद वैद्य,काकासाहेब ढेपले, शिक्षिका 
पल्लवी वाढवे,मीनाक्षी नांगरे,मीनाक्षी मांट्टे, रुपाली पांडव,कविता पवार,मीनाक्षी तळले,रोहिणी देशमुख,
द्वारका शिंदे,प्रतिभा ओहळ, शोभा धुमाळ,कविता सरोवर,ह्या सहभाग नोंदवीत आहेत.(फोटो कॅप्शन-महिला मतदार "मतदान जागृती मेळाव्य�

No comments:

Post a Comment