दोस्ती फाऊंडेशन च्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रातील कलावंतांना पुरस्कार प्रदान - Vaijapur News

Breaking

Monday, October 28, 2024

दोस्ती फाऊंडेशन च्या वतीने राज्यातील विविध क्षेत्रातील कलावंतांना पुरस्कार प्रदान

 
वैजापूर ता,२८
दोस्ती फाउंडेशन आयोजित लोककलावंत स्व,मजनुभाई शेख  स्मृती गौरव पुरस्काराचे वितरण 
रविवार (ता,२७)रोजी  मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बालकवी व जेष्ठ साहित्यीक
धोंडीरामसिंह राजपूत होते, तर सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले.पुरस्कार्थींना संबोधित करतांना धोंडीरामसिंह राजपूत म्हणाले की," शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक,परंपरागत संस्कृती व मूल्ये
जपणारे भारुडकार, लोककलावंत यांनी, आपल्या विविध क्षेत्रातील कामगिरी आणखी उंचावून, समाज
बांधलकी जपावी, व समाज ऋण फेडावे".सुभाष सोनवणे यांनी ही पुरस्कार्थींचे अभिनंदन करीत, आणखी उत्कृष्ट कार्याची त्यांच्या कडून अपेक्षा केली.दोन्ही पाहुण्यांनी आयोजक रज्जाक भाई शेख व आनंदा  साळवे यांचे करून हा कार्यक्रम दरवषी राबवावा व राज्यातील गुणवंतांची पाठ थोपटावी अशा
शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाआरंभ पाहुण्यांच्या हस्ते पुस्तक पूजनाने झाला.या प्रसंगी व्यासपीठावर जेष्ठ
साहित्यिका रंजना बोरा, आयोजक मीराबक्ष बागवान,रविकांत शार्दूल,श्रीमती सुनीता कपाळे, अशोक शर्मा,सीमा राणी बागुल यांची उपस्थिती होती.
सूत्र संचलन गझलकार बाळासाहेब गिरी यांनी केले तर आभार आनंदा साळवे यांनी मानले.राज्यातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे ३० पुरस्कार्थींना
स्मृती चिन्ह,सन्मान पत्र व शाल देऊन त्यांच्या कार्याचा
गौरव करण्यात आला,देविदास बुधवंत,नितीन गायके,राजेंद्र देसाई,अमिनभाई शेख, सत्तार शेख,नसीर सय्यद,अमोल शिंदे डॉ, शैलेंद्र भणगे यांनी सहभाग नोंदविला.(फोटो कॅपशन--,राज्यातील गुणी सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक,व कलाकारांचे गुणगौरव करतांना जेष्ठ साहित्य�

No comments:

Post a Comment