वैजापूरात दिवाळी पहाट निमित्त रंगली गाण्याचीमैफिल("पहाट) - Vaijapur News

Breaking

Tuesday, October 29, 2024

वैजापूरात दिवाळी पहाट निमित्त रंगली गाण्याचीमैफिल("पहाट)

 
वैजापूर ता,३०
जाएन्ट्स ग्रुप ऑफ वैजापूर व यंग सहेली यांच्या वतीने येथील वैजिनाथ महादेव मंदिरात (मोठे महादेव मंदिर )येथे बुधवार(ता,३०)रोजी पहाटे  पांच  वाजता "दिवाळी पहाट"हा दिवाळी शुभेच्छा व शुभ कामना प्रदान करणारा मंगलमय गीतांचा बहारदार कार्यक्रम श्री ,गणेशाच्या नमनाने आरंभ झाला.छत्रपती संभाजीनगर येथील स्वरानंद ग्रुप यांनी पहाटेच्या या शीतल व मन प्रसन्न करणाऱ्या मंगलमय वातावरणात उपस्थित श्रोते मंडळी यांची मन आपल्या
मधुर व मंगलंय गीतांनी भारावून टाकली.दिवाळी च्या
पूर्वसंध्येला वैजापूर वासीयांना जायेंट्स ग्रुप वैजापूर व यंग सहेलीच्या या बहारदार गीतांच्या कार्यक्रमानी दिवाळी पूर्वीचा मनसोक्त आनंद दिला.जायेंट्सच्या प्रार्थनेने कार्यक्रम आरंभ झाला. सौ,संतोषी रूपेश भालेराव यांनी प्रार्थना सादर केली त्यांना अध्यक्षा वैशाली साखरे व सौ, मंजिरी खैरे यांनी सहकार्य केले, सदस्या सौ.योगिता कैलास साखरे आलेल्या प्रत्येक रसिकांचे औक्षण करीत होत्या, त्यांना डॉ,सौ,सोनवणे व अनघा आंबेकर सहकार्य करीत होत्या,जायेंट्स च्या सर्वे सर्वा संस्थापक अध्यक्षा सौ,अंजली सुरेश जोशी आलेल्या सर्वांचे स्वागत करीत होत्या.सर्वश्री डॉ,एस, एम, जोशी,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक धोंडीरामसिंह राजपूत, रवींद्र आप्पा साखरे,  डॉ,उद्धव सोनवणे,मुकुंदशेठ दाभाडे,गोविंद शेठ दाभाडे,सुरेश धुमाळ, रामकृष्ण साठे,प्रकाश माळी, कैलास साखरे, बापू देशमुख ,निलेश कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती तर महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता .संध्याताई ठोंबरे, सुनीता संचेती,सौ,देशपांडे,श्रीमती ज्योती जोशी,अलका साखरे,मंदा तांबे,संगीता भालेराव, श्रीमती वाळेकर,श्रीमती कुलकर्णी,सविता संचेती,सुनीता संचेती,  विद्या वाळेकर ,विद्या चापानेरकर,श्रीमती जोशी,श्रीमती पवार यांच्या सह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या,सौ, अंजली जोशी व संतोषी भालेराव यांनी सर्वांना दिवाळी शुभेच्छा दिल्या(फोटो कॅप्शन-सौ अंजली जोशी,डॉ,सुरेश जोशी,श्री साठे,धोंडीराम राजपूत, व ईतर)

No comments:

Post a Comment