फटाके न फोडता व घराला रंग ,रंगोटी न करता या रक्कमेतून दिव्यांग,निराधार,गोर, गरीब,दीन, दुबळे यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून त्यांना साडी चोळी,
उपरणे ,टोपी व दिवाळी फराळ साठी ठराविक रक्कम प्रदान करुन येथील ऑल इंडिया सेंट्रल एक्स ,पॅरॅमिलिट्री फोर्स वेल फेअर असोसिएशन महाराष्ट्र चे सेक्रेटरी सेवा निवृत्त(सीआरपीएफ)चे जवान गौतम अशोक गायकवाड, त्यांच्या मातोश्री सुमनबाई गायकवाड, तसेच सामाजिक कार्यकर्ते ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांनी सामाजिक बांधिलकी जपत श्री,संकट मोचन हनुमान मंदिर समोर व नौगाजी बाबा दर्गा समोर बसणाऱ्या दिव्यांग,दीन, दुबळे ,गोर,गरीब व निराधार यांना ४०साड्या,चोळी,उपरणे व टोपी व दिवाळी फराळासाठी ठराविक रक्कम प्रदान करून या दिव्या-
गाचीही दिवाळी गोड-धोड होवो म्हणून सामाजिक दायित्व जपत त्यांना सहाय्य केले. या दिव्यांगाना ही
मदत मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर दिवाळी आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. वाढते प्रदूषण ,अस्वच्छता,व पर्यावरण प्रदूषण,ध्वनी प्रदूषण हे फटाक्यांमुळे वाढते ही संकल्पना विचारात घेवून सदरील उपक्रम राबविण्यात आला.त्यांना समर्थ गायकवाड,सौ,मनीषा गौतम गायकवाड,विराज गायकवाड यांनी सहकार्य केले,(फोटो कॅप्शन-दिव्यांग व दीन, दुबळ्यांना दिवाळी भेट प्रदान करतांना गौतम गायकवाड, धोंडीराम राजपूत,सुमनबाई गायकवाड)
No comments:
Post a Comment