वैजापूर ता,०८
वर्ष१८९५मध्ये क्ष-किरण चा शोध लागला,आज १२९वर्षे होत आहेत, आज सोनोग्राफी, सिटी स्कॅन, एमआयआर असे विविध अत्याधुनिक यंत्र सामुग्री चे
शोध मानवी शरीरातील छुपे आजार शोधण्यासाठी निघत आहेत मात्र या सर्वांचा उपयोग डॉक्टर यांच्या सल्ल्याने करून निरोगी जीवन जगावे असा सल्ला जिल्हा आरोग्य समिती सदस्य व रुग्ण कल्याण समिती सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह
राजपूत यांनी आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन निमित्त आयोजित कार्यक्रमात उपजिल्हा रुग्णालय येथे शुक्रवार(ता,०८)रोजी या निमित्त आयोजित रुग्ण शिबीर व चित्रप्रदर्शनी समयी उदघाटन करतांना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप जिल्हा रुग्णालयाचे
वैद्यकीय अधीक्षक डॉ,बी,एन, मोरे होते तर प्रमुख उपस्थिती डॉ,अभिजित अन्नदाते यांची होती.राजपूत पुढे म्हणाले की, कॅन्सर सारखे जीवघेणे आजाराचे निदान अत्याधुनिक तपासणी यंत्राने तात्काळ होते, व त्याचे उच्चाटन ही होते.मात्र व्यक्तींनी विविध व्यसनांची सवय सोडावी,आहार ,विहार,फलाहार यांना प्राधान्य द्यावे व निरोगी जिवन जगावे.आरंभी रेडिओलॉजी शास्त्रज्ञ विल्हेम रोटजेंन याच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी
दिन निमित्त आयोजित प्रदर्शनी चे उदघाटन ही करण्यात आले.
या समयी रुग्ण महिला व पुरुष
मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक व सूत्र संचलन किशोर वाघुले यांनी केले.त्यांनी या दिनाचे औचित्य साधत उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सखोल माहिती दिली.या प्रसंगी उप जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ,दीपमाला
मरमट(परदेशी),जिल्हा पर्यवेक्षक संजय पवार,विभाग प्रमुख सौ,महाडिक,सौ,जंगम,तसेच रुग्णालयाचे विजय पाटील,लक्ष्मीकांत दुबे, पंकज कांबळे,श्याम उचित,श्रीमती भाग्यश्री मॅडम,ज्ञानेश्वर भारुड,श्री,गडकरी,श्री,शिराळे क्ष किरण विभाग व सोनोग्राफी विभाग कर्मचारी व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी श्याम उचित यांनी आभार मानले.
(फोटो कॅप्शन-धोंडीरामसिंह राजपूत, वैद्यकीय अधीक्षक डॉ,बी,एन,मोरे,डॉ,दीपमाला मरमट व इतर)
No comments:
Post a Comment