सेवा निवृत्त पेन्शनधारकांनी आपले हयात प्रमाण पत्र३०नोव्हेंबर,२०२४पूर्वी दाखल करावे - Vaijapur News

Breaking

Saturday, November 9, 2024

सेवा निवृत्त पेन्शनधारकांनी आपले हयात प्रमाण पत्र३०नोव्हेंबर,२०२४पूर्वी दाखल करावे


वैजापूर ०९
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद सेवा निवृत्त कर्मचारी,पालिका सेवा निवृत्त कर्मचारी, सर्व शैक्षणिक संस्थांतील  सेवा निवृत्त शिक्षक, प्राध्यापक,कर्मचारी
व शासनाच्या विविध कार्यालयातील पेंशन धारक सेवा निवृत्त कर्मचारी यांनी आपले हयात प्रमाण पत्र विहीत
नमुन्यात तसेच पॅन कार्ड प्रमाण पत्र सत्य प्रत व आधार प्रमाण पत्र सत्य प्रत आपापल्या कार्यालयात ३० ,नोव्हेंबर पूर्वी सादर करावी.जे पेंशन धारक राष्ट्रीय कृत बँकेतून शासकीय कोषागार द्वारे पेंशन घेतात त्यांनी बँकेत जाऊन आपली स्वाक्षरी पॅन कार्ड नंबर व आधार कार्ड नंबर,मोबाईल नंबर नोंदवून स्वाक्षरी मॅनेजर समक्ष करावी.जे पेंशनर्स ३०नोव्हेंबर ,२०२४
पूर्वी आपले हयात प्रमाण पत्र सादर करणार नाहीत त्यांना पुढील पेंशन मिळण्यास अडचणी येतील याची नोंद सर्व पेंशनर्स यांनी घ्यावी,व ३० नोव्हेम्बर २०२४ पूर्वी आपले हयात प्रमाण पत्र दाखलच  करावे,असे आवाहन  वैजापूर पेंशनर्स संघटनेचे अध्यक्ष धोंडीरामसिंह राजपूत यांनीकेले आहे.बँक मॅनेजर किंवा संबंधित कार्यालय प्रमुख यांना विनंती आहे की,जे पेंशनर्स बिछान्याला खिळलेले आहेत ,त्यांच्या नातेवाईक मार्फत आलेल्या आवश्यक प्रमाण पत्रांचा स्वीकार करावा. बँकांनी अशा पेंशनर्स च्या घरी स्वाक्षरी बुक पाठवून  त्याची स्वाक्षरी घेऊन वृद्ध व अति जेष्ठ पेंशनर्स यांना सहकार्य करावे अशी विनंती ही राजपूत यांनी संबंधिताना केली आहे.(फ़ोटो पेंशनर्स संघटनेचे अध्यक्ष धोंडीरामसिंह राजपूत)

No comments:

Post a Comment