विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये
मतदानाची टक्केवारी वाढावी व समाजातील सर्वच
स्तरावरील मतदारांनी येत्या २० नोव्हेंबर,२०२४ रोजी
मतदानाचे आपले राष्ट्रीय कर्तव्य बजवावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते ,जेष्ठ नागरिक व मराठवाड्याचे जेष्ठ साहित्यिकधोंडीरामसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार(ता,१०)रोजी जेष्ठ नागरिकांनी स्वतः मतदान करून इतर मतदारांनाही मतदान करण्यास प्रवृत्त करण्याचा संकल्प केला.निमित्त होते आधार जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या
जेष्ठ नागरिकांच्या मासिक बैठकीचे.आयोगाच्या मतदार जागृती अभियान अंतर्गत धोंडीरामसिंह राजपूत यांनी जेष्ठ नागरिकांना मतदान हक्क व त्यांच्यां मतदान करण्याच्या मूल्याबाबत सर्व जेष्ठ
नागरिकांना माहिती दिली,व मतदान करण्याचे आवाहन केले,या प्रसंगी अध्यक्ष स्थानी
चैतन्य जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष साहेबराव साळुंके होते त्यांनीही उपस्थित जेष्ठांना मतदान करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात जवळपास शंभर जेष्ठ नागरिक उपस्थित होते,यांच्या शिवाय वैजीनाथ जेष्ठ नागरिक सेवा संघाचे उपाध्यक्ष रवींद्र आप्पा साखरे,आधार जेष्ठ
नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव साळुंके,अण्णासाहेब शेळके,से,नि, पोलिस अधिकारी सोपान निकम,बबन क्षीरसागर, से,नि, प्राचार्य, एस, ए,साठे,प्रा,फुलचंद श्रीवास्तव, से,नि, मंडल अधिकारी अशोक आप्पा पवार खंडाळकर, जेष्ठ नागरिक वसंतराव साळुंके,अली अहमद नजीर, पोपट भोसले,दगु वाणी,रंजक शेटे,सोन्याबापू गावडे,काळे मामा,मनोहर सोमवंशी,मुकुंद दाभाडे,कृष्ण कांबळे,घनश्याम वाणी,आसाराम निकम गुरुजी,पुंडलिक चव्हाण, शहरातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,सूत्र संचलन राजपूत यांनी केले.
आभार आसाराम निकम यांनी मानले.(फोटो कॅपशन-स्वीप अंतर्गत जेष्ठ मतदारात जागृती करतांना राजपूत, शेळके, साळुंके, बापू गावडे, व पवार इत्यादी)
No comments:
Post a Comment