वैजापूर ता,१५
या विश्वातील संपूर्ण मानव समान आहे.माणसा-माणसातील भेदभाव हा माणसांनी निर्माण केलेला आहे,ईश्वर सर्व मनुष्यात आहे. माणूस हीच जात,माणूस हाच धर्म,व माणूस हाच संप्रदाय असे श्री
नानाकजिनी संपूर्ण जगताला सांगितले त्यांच्या या मानवतेच्या संदेशाची आज या जगताला गरज आहे,असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांनी शुक्रवार(ता,१५)रोजी
गुरू नानाकजी यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात गुरुद्वारा येथे केले.येथील गुरुद्वारात नानकजी यांच्या जयंती निमित्त, गुरुवाणी, प्रतिमा मिरवणूक,भजन,कीर्तन ,गुरू ग्रंथ साहिब या शिख बांधवांच्या पवित्र धर्म ग्रंथाचे पठण व लंगर भोजन
असे विविध कार्यक्रम या निमित्ताने उत्साहात संपन्न झाले,महिला वर्गाची मोठी उपस्थिती या समयी होती.प्रीती खनिजो,गुरू ग्यानसिंग पोथीवाल,दिलजीत
सिंग खनिजो,सुरजित कौर खनिजो यांनी सक्रिय पुढाकार घेतला. या प्रसंगी नंदकुमार आहुजा,गुरूंदीप-
सिंग सब्बरवाल,रमेश पंजाबी,राजेंद्रकुमार आहुजा, दिनदयाल आहुजा,गोलू पंजाबी,प्रिती खनिजो, इंप्रीत
खनिजो ,गुरुज्योत खनिजो, ज्योती आहुजा, एकता आहुजा,सुरजित कौर खनिजो,अमर आहुजा, सागर आहुजा, गुरुप्रीत सब्बरवाल, सन्मितखनिजो यांनी सहभाग नोंदविला(फोटो कॅप्शन-गुरूनानकजी प्रतिमा
मिरवणूकित सहभागी धोंडीराम राजपूत, दिलजीत खनिजो,प्रीती खनिजो,गुरू ग्यानसिंग पोथीवाल)
No comments:
Post a Comment