शिवेश्वर संस्थान वाकी देवाची पायी दिंडीचे वैजापूरातउत्साहात स्वागत व निरोप - Vaijapur News

Breaking

Friday, November 15, 2024

शिवेश्वर संस्थान वाकी देवाची पायी दिंडीचे वैजापूरातउत्साहात स्वागत व निरोप


वैजापूर ता,१५
गेल्या २४वर्षापासून कन्नड तालुक्यातील शिवेश्वर संस्थान, वाकी देवाची येथून पायी दिंडी आळंदीला जात आलेली आहे.याही वर्षी ही दिंडी वाकीहुंन११नोव्हेंबर ला निघाली शुक्रवार(ता,१५)रोजी ही दिंडी वैजापूरात आल्यावर गेल्या २४वर्षापासून बापूसाहेब गावडे व मित्र परिवार या पायी दिंडीचे उत्साहात स्वागत करतात ,याही वर्षी गावडे मित्र परिवाराने या दिंडीचे उत्साहात स्वागत केले, दुपारच्या आमटी भाकरी व लापशीचा प्रसाद ही प्रदान करून
त्यांना आळंदी साठी निरोप दिला.ब्रह्मलिन नारायण देव बाबा ,ब्रह्महलीन भावराव महाराज काटकर यांचे स्मरण करून हभप नामदेव महाराज पल्हाड यांनी उपस्थित भक्त भाविकांना संबोधित केले.प्रास्तविक माजी शिक्षणाधिकारी व जेष्ठ नागरिक धोंडीरामसिंग राजपूत यांनी केले.या पायी दिंडी समवेत हभप तुळशीराम महाराज, हभप जगन्नाथ लोखंडे महाराज,हभप पल्हाड गुरुजी,
हभप जे,टी, मोकाशे, एकनाथ महाराज मोकाशे,चोपदार दिलीप इंगळे,एकनाथ पवार,एकनाथ ताते,लक्ष्मण गुरुजी,देशमुख मामा,रंगनाथ बनसोड,हभप श्रीमती काटकर ताई,राहिताई,मीराताई
इत्यादी सेवेकरी यांचा समावेश आहे,याचेही पूजन करण्यात आले.बापूसाहेब गावडे,रवि गावडे,जेष्ठ पत्रकार घनश्याम वाणी ,दीपक साळुंके,अशोक आप्पा पवार, दिगंबर खंडागळे,से,नि, पोलीस अधिकारी सोपानराव निकम,रामकीसन जोरे,काथवटे मामा,
गोरख गावडे,बाबुराव सुरासे, बाबुराव गावडे,सौ,शोभा गावडे,सिंधुबाई साळुंके, कांता आलूले,अशोक निखाडे, गणेश नांगरे,सोनाली गोरे,प्रा.डी एस, गायकवाड, सोपान वाणी, अशोक अण्णा चव्हाण राजेंद्र पा, साळुंके ,श्रीकांत साळुंके,प्रकाश साळुंके,यांनी सहभाग नोंदवून संत,महंत यांचे पूजन केले,ही पायी दिंडी आळंदीला दि२५-११-२०२४ रोजी पोहचेल.
२६ ,नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशी आहे,त्या कार्यक्रमात दिंडी सहभागी होईल.(फोटो कॅप्शन--दिंडीला निरोप देतांना बापूसाहेब गावडे,घनश्याम वाणी, सोपानराव निकम,धोंडीरामसिंह राजपूत)

No comments:

Post a Comment