येत्या २०नोव्हेंबर ,२०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा
सार्वत्रिक निवडणुकी साठी मतदान होणार आहे ,त्या अनुषंगाने वैजापूर येथे मतदार जनजागृती व्हावी व १००टक्के मतदान व्हावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांनी शहरातील मतदारांना
मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी पारंपरिक वेशभूषा करुन मतदान जागृती करण्यासाठी ते शहरात विविध ठिकाणी मतदारांना मतदान महत्व विशद करून मतदान करण्यास आवाहन करीत आहे,
येथील देशपांडे गल्ली ,न्हावी गल्ली,सुतार गल्ली,मुजाळी या भागात मतदान केंद्रस्थ अधिकारी
रामचंद्र खैरनार यांच्या सोबत निवडणूक आयोगाचे
मतदार जागृती भित्तीपत्रक ते वरील विभागात नागरिकांना दाखवून मतदान जनजागृती करीत आहेत, नुकतेच त्यांनी हे भित्ती पत्रक गल्लीतील मतदार दाणे पाटील, बापू पवार,विजयसिंह फौजी
व मतदान केंद्रस्थ अधिकारी रामचंद्र खैरनार यांच्या समवेत मतदारांना दाखवून १००टक्के मतदान करण्याचे आवाहन केलेले आहे.(फोटो कॅप्शन-मतदार
जागृती करताना राजपूत ,पवार,दाणे,व खैरनार)
No comments:
Post a Comment