वैजापूरात  सामाजिक बांधिलकी जपत माणूसकीचीभाऊबीज/ दिवाळी निमित्त साडी-चोळी व मिठाई वाटप - Vaijapur News

Breaking

Monday, November 18, 2024

वैजापूरात  सामाजिक बांधिलकी जपत माणूसकीचीभाऊबीज/ दिवाळी निमित्त साडी-चोळी व मिठाई वाटप

वैजापूरात  सामाजिक बांधिलकी जपत माणूसकीची
भाऊबीज/ दिवाळी निमित्त साडी-चोळी व मिठाई वाटप
वैजापूर ता,१८
समाजातील दीन, दुबळे,निराधार,अनाथ व असाह्य
जीवन जगणाऱ्या येथील नौगाजीबाबा दर्ग्यात राहणाऱ्या महिला तसेच वीट भट्टी कामगार, ऊस तोड
कामगार यांच्या विषयी सामाजिक बांधिलकी जपत
येथील शिवरत्न जिवाजी महाले समिती,महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महासंघ,यशश्री जनविकास प्रतिष्ठान,माणुसकी ग्रुप,साई लक्ष चेतना प्रतिष्ठाण,
व वैजापूर सायकलिंग व स्वीमिंग ग्रुप,केपी सुपर मार्केट  यांनी दिलेल्या व शिवरत्न जिवा महाले समिती
ने  संकलित केलेल्या १४७साडी चोळी व मिठाई पुडे याचे रविवार (दि, १७)रोजी सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह
राजपूत,अशोक आप्पा पवार,प्रा,आबासाहेब कसबे,सौ,कसबे,बाबासाहेब जगताप, दिलीप अनर्थे,रणजित मथुरिया,प्रमोद पठारे,आबा साहेब जेजुरकर,बाबासाहेब गायकवाड,रणजित मथुरिया, यांच्या हस्तेवाटप करण्यात आले.साडी ,चोळी व मिठाई घेतल्यावर या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य व प्रफुल्लता दिसून आली.बाबासाहेब जगताप यांनी प्रास्ताविक केले,धोंडीराम राजपूत यांनी महिलांचे प्रबोधन केले तर दिलीप अनर्थे यांनी आभार मानले.
सर्पमित्र अमित अनर्थे, रमेश तोडकर,दिलीप विश्वासू,कल्पेश शेटे, शंकर खैरनार यांनी पुढाकार 
घेतला.
रामचंद्र खैरनार,अशोक आप्पा तांबुस,मोहन थोरात,कृष्णा तागड.यांनी सहभाग नोंदविला, तर सुधाकर आहेर, रामकृष्ण औटी,एम,जी,राऊत,पुष्पा 
सोमवंशी,गौरी तांबूस,रुपाताई चिकडू,मीना अनर्थे, अर्जुन करणकार,प्रवीण साखरे, कैलास शेजवळ, बी,के,म्हस्के,मनीष दिवेकर,संजय वाघ,मधुकर नाईकवाडी,कल्पेश शेटे,कृष्णा तागड, मोहन थोरात,
एन, के,गायकवाड,के, पी,सुपर मार्केट यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले,शेवटी अनर्थे यांनी आभार मानले,.

No comments:

Post a Comment