वि.पा.महाविद्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी याचे ११२वैजापूर -गंगापूर विधानसभा निवडणूक कार्यालय आहे.सोमवार (ता,१८)रोजी सकाळी या मतदार संघातील३५ निवडणूक क्षेत्रातील ४२ चार चाकी वाहने,व निवडणूक निर्णय अधिकारी व पोलीस अधिकारी यांची वाहने अशा५०वाहनांची मतदार जन
जागृती फेरी वि,पा, महाविद्यालय येथून येवला मार्गे ,शहराकडे रेल्वे स्टेशन रोड व पुतळ्यांच्या उजव्या बाजूने वळून पुन्हा वि, पा, महाविद्यालय अशी फेरी
काढून मतदार जनजागृती करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ,अरुण जऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतदार जागृती फेरी काढून शहरात मुख्य मार्गावर मतदार जागृती करण्यात आली. उद्या मंगळवार(ता,१९)रोजी मतदान निवडणूक पथक आपापल्या नेमणुकीच्या मतदान केंद्रावर नियोजित वाहनांनी रवाना होणार आहे.
या फेरीत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ,अरुण जऱ्हाड,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील सावंत , उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे,पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे,नायब तहसिलदार श्रीमती भालचीन,रामेश्वर महाजन,सुरज
कुमावत, किरण नारखेडे,पारस पेटारे,श्री काकडे यांच्या सह निवडणूक अधिकारी, व कर्मचारी,क्षेत्रीय अधिकारी सहभागी झाले होते.(फोटो कॅप्शन -वाहन मतदान फेरीत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी
तहसीलदार सुनील सावंत व निवडणूक अधिकारी)
No comments:
Post a Comment