आचार संहितेमुळे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम स्थगित होते,त्यात शाळाही दिवाळी सुट्टी साठी बंद होत्या आता सर्वत्र सामाजिक, शैक्षणिक , व सांस्कृतिक कार्यक्रम आरंभ झालेले आहेत ,याचाच भाग म्हणून रविवार(ता,२४)रोजी येथील निर्मला इन्स्टिट्यूट च्या वस्तीगृहातील मुलींनी चाचा नेहरु यांच्या जयंती निमित्त एक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल
नेहरू यांना अभिवादन केले.या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी तथा जेष्ठ
साहित्यिक धोंडीरामसिंह राजपूत होते, ते म्हणाले की,"शालेय जीवनातील सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमातून विद्यार्थी जीवनाची सकारात्मक जडण-घडण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी असे कार्यक्रम गरजेचे असतात.शाळा महाविद्यालयांनी मुलांच्या सुप्त कला,गुणांना चालना देणारे कार्यक्रम आयोजित करणे ही काळाची गरज आहे"असेही राजपूत म्हणाले," विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वच्छता जनजागृती नाटिका, वृक्ष संवर्धन,आरोग्य हीच संपत्ती, महात्मा जोतीबा फुले व सावित्री बाई यांच्या शिक्षण क्षेत्रातील जनजागृती नाटिका ,वृक्षारोपण, व मुलींच्या छेडछाडीच्या वाढते प्रकार हे जनजागृती कार्यक्रम सादर करणाऱ्या मुलींची त्यांनी स्तुती केली.
या प्रसंगी डॉ,प्रतिमा सोनवणे यांनीही मुलींनी अधिक सावध राहण्याची गरज व्यक्त केली,त्यानी स्वच्छता व शिस्त वर प्रकाश टाकला, प्रास्ताविक वॉर्डन मार्गारेट डीब्रिटो यांनी केले,आभार संचालिका तारीका एक्का यांनी मानले.लिलीएन डीसुझा,ओलिसिया फलका ,छाया बंगाळ यांनी सहभाग नोंदविला. उत्कृष्ट कार्यक्रम सादरीकरणला पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वाटप ही झाले. सूत्र संचलन शालेय मुलींनी केले,(फोटो कॅप्शन-निर्मला इन्स्टिट्यूट च्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी धोंडीराम राजपूत,डॉ,प्रतिमा सोनवणे, मार्गारेट,तारीका एक्का व ईतर
No comments:
Post a Comment