महिलां व मुलींवर आज सर्वत्र अन्याय, अत्याचार, लैंगिक अत्याचार व हिंसाचार वाढत असून या दलदलीतून त्याना बाहेर काढण्यासाठी गावो-गावी महिला व मुली हिंसा विसहभागसहभागरुद्ध फेरी काढून जन जागृती करण्याची नितांत गरज आहे ,असे प्रतिपादन रंजना ताई सिस्टर यांनी निर्मला इन्स्टिट्यूट या सामाजिक संस्थेच्या वतीने मंगळवार(ता,०३)रोजी तालुक्यातील म्हस्की -विरगाव येथे"महिला हिंसा विरुद्ध पंधरवडा" निमित्त आयोजित जन जागृती कार्यक्रमात काढले.२५नोव्हेंबर ते १०डिसेंम्बर दरम्यान तालुक्यातील ग्रामीण भागात विविध खेड्यामध्ये शालेय शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहकार्याने फेरी काढून व घोषणा देऊन महिला हिंसा विरुद्ध महिला जन जागृती करण्यात येत आहेत.या प्रसंगी वैजापूर चे
जेष्ठ समाजसेवक तथा जेष्ठ साहित्यीक ठा,धोंडीरामसिंह राजपूत हे प्रमुख पाहुणे होते,ते म्हणाले की," महिलांकडे व मुलीकडे पाहण्याचा पुरुषांनी आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे. महिला हिंसा हा सामाजिक अपराध आहे,हा थांबायला हवा
असेही राजपूत पुढे म्हणाले.या प्रसंगी या शाळेचे मुख्याध्यापक श्रीकिसन नागरे अध्यक्ष स्थानी होते,तर मार्गा रेट डिब्रेटो व छाया बंगाळ यांची प्रुमुख उपस्थिती होती."एक दोन तीन चार-नारी शक्तीचा जय ,जय कार" नारी शक्ती -देशकी शक्ती", नारी सन्मान-देशका
सन्मान" " बेटी बचाओ -बेटी पढाओ", अशा घोषणा देत म्हकी -विरगावातून विद्यार्थी व शिक्षक व निर्मला इन्स्टिटय़ूट चे सर्व कार्यक्रते यांची फेरी काढण्यात आली-.,या समयी शाळेतील शिक्षीका श्रीमती सुनीता
चव्हाण,श्रीमती पूजा पाथरकर, व शिक्षक सर्वश्री नंदू जाधव,समाधान देवरे, उमेश पगारे,प्रभाकर बारसे,रवींद्र यांनी सहभाग
नोंदविला. शेवटी समाधान देवरे यांनी आभार मानले
No comments:
Post a Comment