वैजापूरात विश्वरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्यामहापरिनिर्वाण दिन निमित्त सामूहिक अभिवादन - Vaijapur News

Breaking

Thursday, December 5, 2024

वैजापूरात विश्वरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्यामहापरिनिर्वाण दिन निमित्त सामूहिक अभिवादन


वैजापूर ता,०६
भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन निमित्त शुक्रवार(ता,०६)रोजी शहरातील सर्व थरातील नागरिक यांनी डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर एकत्र येत महामानवाना अभिवादन केले.सर्वप्रथम पालिकेच्या प्रशासक डॉ,सौ, संगीता नांदूरकर व पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्प व प्रतिमेला अभिवादन केले,नंतर आलेले तहसीलदार सुनील सावंत,व आ,रमेश पाटील बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे,पडवळ गुरुजी आयोजक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रशांत त्रिभुवन, साहेबराव पडवळ व सामाजिक समाजसेवक धोंडीरामसिंह राजपूत,प्रमोद निकाळे,प्रभाकर त्रिभुवन,नवनाथ वाघ  यांनी अभिवादन केले.या प्रसंगी डॉ.नांदूरकर उपस्थितानासंबोधित करताना म्हणाल्या की,जागतिक स्तराची उंची असलेले महामानव डॉ,बाबासाहेब आंबेडकर स्त्री उद्धारक होते, त्यांच्या  शैक्षणिक,सामाजिक, व घटनात्मक कार्याला त्रिवार अभिवादन करून त्यांच्या उच्च तत्व व विचारांना सर्वांनी आचरणात आणावे".कोठाळे यांनी विशद केले की,आपल्या मुलां मुलींना ऊच्च शिक्षण देऊन त्यांचे जीवन घडवा,बाबासाहेबांचे शिका,संघटित व्हा व संघर्ष करा हे तत्व आचरणात आणा".या प्रसंगी पडवळ गुरुजी यांनी वंदना सादर केली,या प्रसंगी श्रीमती नंदा गायकवाड,रंजना साळवे, करुणा बागुल,शांताबाई भुईंगळ, श्री ,भुईंगळ, लता साळवे रेखा पठारे,कुंदना थोरात, तसेच कैलास भाटे, दिनेश राजपूत, पत्रकार दीपक बरकसे, आबा कसबे,श्री जानराव,बाबासाहेब गायकवाड, दिलीप अनर्थे, अशोक पवार, मधुकर साळुंके,श्रीकांत साळुंके,गिरीश
चापानेरकर,शाहीर अशोक बागुल,विशाल दिवे, श्री,शिंदे,
 सपोनि विजय देशमुख,संतोष जाधव,सोमनाथ गायकवाड, शरद मोहगिर,ज्ञानेश्वर घोडके, अमोल बोरनारे,   शिवलिंग आप्पा साखरे यांच्या सह शहरातील विविध स्तरावरील पुरुष व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते,सुत्रसंचलन धोंडीराम राजपूत यांनी केले,नियोजन साहेबराव पडवळ यांनी केले तर आभार कृषी उत्पन्न बाजार समिती  संचालक प्रशांत त्रिभुवन यांनी मानले.(फोटो कॅप्शन- पालिका प्रशासक डॉ, संगीता नांदूरकर व पो,नि, कोठाळे डॉ, आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करतांना)

No comments:

Post a Comment