दीन, दुबळे,गोर गरिब व भिक्षा मागणाऱ्यांची दु:खे समजून घेऊन त्याना सेवा देणे ही खरी ईश्वर भक्ती व सेवा होय-- - Vaijapur News

Breaking

Saturday, December 7, 2024

दीन, दुबळे,गोर गरिब व भिक्षा मागणाऱ्यांची दु:खे समजून घेऊन त्याना सेवा देणे ही खरी ईश्वर भक्ती व सेवा होय--

वैजापूर  ता,०७
या भूतलावर राहणाऱ्या कोणत्याही जाती,धर्म,पंथ, व संप्रदायाच्या  गोर, गरीब ,दीन ,दुःखी व भिक्षा मागून जीवन जगणाऱ्या व्यक्तींच्या वेदना,दुःखे, त्यांच्या गरजा जाणून त्या अनुषंगाने त्यांना सहाय्य  करणे ही खरी ईश्वर भक्ती व ईश्वर सेवा होय असे उदगार जेष्ठ समाजसेवक ठा, धोंडीरामसिंह राजपूत यांनी शनिवार(ता,७)रोजी संकट मोचन हनुमान मंदिर व नौगाजी बाबा दर्गा समोर भिक्षा मागून पोट भरणाऱ्या
दीन, दुबळे,दिव्यांग,यांना  उबदार कपडे प्रदान करताना केले.सामाजिक बांधिलकी जपणारे इरफान
कादरी व अकबर कादरी यांनी लोकांच्या सहकार्यातून
या गोर ,गरिबांसाठी हे उबदार कपडे घेऊन  या गरिबांसाठी समाजाचे ऋण फेडण्यासाठी हा उपक्रम राबविला.धोंडीराम राजपूत  यांनी या दोघांच्या या समाज कामाची मुक्त कंठाने स्तुती व प्रशंसा करून
समाजातील इतर घटकानाही मदतीचे आवाहन केलं. या प्रसंगी अकबर कादरी यांनी विशद केले की,दीन ,दुबळ्याची केलेली सेवा ही परमेश्वरला प्राप्त होते.सर्व धर्मात समाजसेवा श्रेष्ठ सेवा मानली असे ते म्हणाले.
या प्रसंगी प्रवीण वाघ,यांनी सहकार्य केले.या सर्व,दीन, दुबळ्यांना  थंडीच्या दिवसात  उबदार रगी  मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद  ओसंडून वाहत होता,जवळ पास पन्नास व्यक्तींना उबदार कपडे प्रदान करण्यात आले.अत्यंत स्तुत्य उपक्रमाची शहरातील  नागरिकांनी
प्रशंसा केली(फोटो कॅपशन संकट मोचन हनुमान मंदिर समोर व नौगाजी बाबा दर्गा समोर बसणाऱ्या दीन, दु:खीना उबदार रगी  व कपडे देतांना पुजारी चंद्रकांत कुलकर्णी,धोंडीराम राजपूत,इरफान व अकबर कादरी)

No comments:

Post a Comment