१९८७-८८ या वर्षी जे विद्यार्थी जि.प.प्रशाला (मुलांची)येथे इयता१०व्या वर्गात शिकत होते,त्या विद्यार्थ्यांची तब्बल ३७वर्षानंतर त्याच शाळेत रविवार(ता,०८)रोजी प्रार्थना,राष्ट्रगीत,सुविचार, व दिन विशेष घेऊन त्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांनी शाळा भरविली व शाळा,मित्र,वर्ग,शिकविणारे विषय शिक्षक या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्या काळी असलेले शालेय पर्यवेक्षक व्ही.जी.कपिल होते त्यांनी उपस्थित १०० विद्यार्थ्यांना संबोधित करतांना प्रतिपादित केले की,वृद्ध आई, वडील यांचा त्यांच्या वार्धक्यात त्यांची काठी बनून त्याचा आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळ करा, त्याच्यावर वृद्धाश्रमात जाण्याची वेळ आणू नका हेच आम्ही दिलेल्या विद्येचे सर्वश्रेष्ठ दान ठरेल असेही ते म्हणाले,श्री. घोडके यांनीही आज असलेली मैत्री शेवटपर्यंत टिकवा, व एक दुसऱ्यांच्या सुख, दुःखाना वाटून घ्या असे आवाहन केले.प्रमुख उपस्थितीत तत्कालीन शिक्षक यु.के.पुणे,के,एस, घोडके, ठाकूर धोंडीरामसिंग राजपूत, घनश्याम आसर,
पी. एम.वेद,बी,के,आव्हाळे, शेख रज्जाक, श्री पडवळ, श्रीमती कपिल,श्रीमती, पाटील,श्रीमती बसवेकर,श्रीमती धसे,हरिश्चंद्र दाभाडे उपस्थित होते. .सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,डॉ,बाबासाहब आंबेडकर, सरस्वतीदेवी यांच्या प्रतिमांचे पूजन झाले.आयोजक सर्वश्री मनोज विखणकर,हेमंत दाभाडे,संजय गायकवाड, प्रमोद निकाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुजन शिक्षकांचे स्वागत व सत्कार केला. प्रास्ताविक आयोजक हेमंत दाभाडे यांनी केले.संचलन शहाणे यांनी केले.वर्ग मित्र
डॉ,अनिल धुळे संजय गायकवाड,शाहीर अंबादास हिंगे यांनी शिवाजी महाराज पोवाडा सादर प्रशांत गरुड,लक्ष्मण बोर्डे, राजेंद्र मेढे,मकरंद भालेराव,राजेश्वर, संजय ढोले यांनी जुन्या आठवणींचा
No comments:
Post a Comment