वैजापूर तालुक्यामधील नामांकित असे असलेले विनायक हायस्कूल विनायक नगर येथील सर्व मित्र परिवार आणि विद्यार्थी 1994 नंतर म्हणजेच 31 वर्षानंतर एकमेकाला भेटून आणि बघून एक दुसऱ्यांच्या गळ्यात पडून आनंदाश्रू वाहू लागले. बऱ्याच दिवसांनी एकमेकांना बघून सर्वजण आवक झाले कारण कोणाचा चेहरा ओळखीचा आहे किंवा नाही हे बघण्यातच कमीत कमी दोन तास गेले. त्यानंतर सर्वांनी एकमेकांना आलिंगन दिल्यानंतर हा सोहळा नागपूर मुंबई हायवे येथील वनश्री हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेला होता. त्यानंतर सर्वांनी एकमेकांचा पात्र परिचय दिल्यानंतर आनंद अश्रू वाहू लागले. कारण हा सोहळा गेट-टुगेदर चा नसून बऱ्याच दिवसांनी भेटणाऱ्या एकमेका मित्रांचा होता. तसे जर बघितले तर सर्वजण गेट-टुगेदर साजरी करतात परंतु या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन फक्त एक दुसऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन या ठिकाणी दिले. हा कार्यक्रम म्हणजे एक अभूतपूर्व पर्वणी आहे असे वाटते. कारण ह्या कार्यक्रमाला कोणीही प्रमुख पाहुणे तथा कोणीही शिक्षक किंवा गुरुजन वर्ग यांना बोलवण्यात आले नाही.
सर्व मित्रांना बोलवण्यात आनंद वाटला डॉक्टर मतसागर..
वैजापूर शहरातील नामांकित डॉ. राजेश मतसागर.
सहज विचार करतांनी माझ्या डोक्यात आलेली कल्पना आणि त्या कल्पनेनुसार मी सहज विचार केला की आपण सर्व मित्र परिवार जे दहावीमध्ये शिकलेले आहेत यांना सर्वांना एकत्रित बोलून आपण काहीतरी आगळावेगळा कार्यक्रम घेऊया असे माझ्या मनात विचार आल्यानंतर आम्ही सर्वांनी असे ठरवले की प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये काम येणे आणि त्यानुसार वागणे आणि आपल्या मुलाला देखील तसे वागण्यासाठी सांगणे असे डॉक्टर मतसागर यांनी सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार सुनील त्रिभुवन. डॉक्टर राजेश मतसागर. तसेच. बंडू वैराळ. रवींद्र अस्वले .कैलास नितनवरे.
राजेंद्र वामन गायकवाड .वाल्मिक कोलते
शांतीलाल बबन वैराळ.
सकाहरी लक्ष्मण गायकवाड
प्रा.बाबासाहेब गायके
शांताराम कारभारी कदम
नामदेव घोडके. अनिल बोर्डे भागीनाथ दौगे कल्याण दाभाडे विजय सरोवर.नंदकिशोर राऊत.मोहन शिंदे घारे पाटीलराजू म्हस्क संतोष मग सुनील जाधव(चेअरमन)जालिंदर इंगळे सुभाष देवकर विजय पवार.बाबासाहेब गायके गणेश इंगळे गौतम बागुल सुदाम कदम माणिक सुपेकर संतोष पठाडे.
यांनी प्रयत्न केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक गायके यांनी मानले.
No comments:
Post a Comment