वैजापूर ता.०१
महाराष्ट्र राज्यात एस. टी.बसेस प्रवास आरंभ होऊन ७७वर्ष झालेली आहेत.या निमित्त वैजापूर आगार व बस स्टेशन मार्फत रविवार(ता,०१)रोजी येथील बस स्थानकात प्रवाशी संघटनेचे सदस्य,आगारचे स्वच्छता दूत व सामाजिक कार्यकर्ते धोंडिरामसिंह राजपूत यांच्या उपस्थितीत व आगार प्रमुख किरण धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली विविध उपक्रम घेण्यात आले.महिला प्रवाशांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले,प्रवाशांना गुलाब फुल ,पेढे,व खडी साखर वाटून त्यांचा सत्कार करण्यात आला.धोंडिरामसिंह राजपूत यांनी बस प्रवास सुरक्षित व आरामदायी तसेच सोयी सवलतीचा आहे तसेच ,ग्रामीण भागातील सेवेचा असल्याने प्रवाशांनी बस प्रवासाला प्राधान्य द्यावे असे प्रवाशांना आवाहन केले, तसेच वाहक व चालक यांनीही संबोधित केले.या प्रसंगी आगार प्रमुख किरण धनवटे,वाहतूक नियंत्रक बी.के.गरुड, वाहतूक नियंत्रकएस. जे. पवार, ,वाहतुक सहाय्यक गोपाल पगारे कार्यालयीन कर्मचारी प्रवीण सोनवणे, भगवान गिरी,कृष्णा जाधव,केतन आहेर, गोपाल सावंत, श्री जाधव,यांच्या सह वाहक,चालक व आगार कर्मचारी व प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.(फोटो कॅप्शन-वैजापूर बस स्थानकावर बसेस च्या ७७व्या वर्धापन दिनी महिला प्रवाशी दीप प्रज्वलन करताना शेजारी आगार प्रमुख धनवटे ,धोंडीराम राजपूत, श्री.गरुड)
No comments:
Post a Comment