वैजापूर- संभाजीनगर ता,०३
सी.आय.आय.(कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज)मार्फत देशातील महिलांनी विविध क्षेत्रात
केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्धल दिला जाणारा १लक्ष
रुपये,सन्मानपत्र असणारा पुरस्कार "वूमन ऍक्से -
मप्लार पुरस्कार -२०२५"जिल्ह्यातील आरोग्य ,शिक्षण
महिला सक्षमीकरण, बालविवाह प्रतिबंध,सामाजिक कार्य व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अन्नपूर्णा संपतराव ढोरे यांना शनिवार ३० जून रोजी देशाच्या महिला बाल कल्याण मंत्री ना,अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. देशातून ४१५प्रस्ताव आले होते त्यापैकी २० सामाजिक कार्यकर्त्या महिलांची निवड झाली, त्यात महाराष्ट्र राज्यातील अन्नपूर्णा ढोरे यांचा समावेश आहे. श्रीमती ढोरे या मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेत
गेल्या १५वर्षांपासून कार्यरत आहेत.त्यानी हा पुरस्कार
प्राप्त करून महाराष्ट्र राज्याचा लौकिक देशात उंचावला आहे. हा पुरस्कार त्यांनी देशातील महिलांना समर्पित केला आहे.समाज कार्य करण्याची त्यांची तळमळ, आरोग्य क्षेत्रात,महिला सक्षमीकरण क्षेत्रात, व बालविवाह प्रतिबंध क्षेत्रात त्या उत्कृष्ट कार्य करीत आलेल्या आहेत.त्यांची ह्या पुरस्कार प्राप्तीबद्धल महिलावर्ग निश्चित प्रेरणा घेईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.त्यांना सामाजिक सेवेसाठी सातत्याने मार्गदर्शन करणारे मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष मनसुख झाबड ,सचिव आप्पासाहेब उगले व सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी त्यांच्या या दैदिप्यमान कामगिरी व राष्ट्रीय पुरस्काराबद्धल अभिनंदन केले आहे.(फोटो कॅप्शन-पुरस्कार स्वीकारताना अन्नपूर्णा ढोरे सह देशातील ईतर महिला)
No comments:
Post a Comment