वैजापूरतील अवैध धंदे,वाहतूक कोंडी,वाळू तस्करी यांना आळा घालणार -नव नियुक्त पोलीस निरीक्षकसत्यजित ताईतवाले. - Vaijapur News

Breaking

Wednesday, June 4, 2025

वैजापूरतील अवैध धंदे,वाहतूक कोंडी,वाळू तस्करी यांना आळा घालणार -नव नियुक्त पोलीस निरीक्षकसत्यजित ताईतवाले.

 
वैजापूर ता,०३
येत्या शनिवार रोजी  बकरी ईद आहे,त्या पार्श्वभूमीवर नव्यानेनियुक्त झालेले पोलीस निरीक्षक  सत्यजित ताईतवाले यांनी मंगळवार(ता,०३)रोजी पोलीस स्टेशनमध्ये शांतता समिती सदस्य बैठक बोलावली होती.उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सम्पन्न झाली.त्याप्रसंगी सत्यजित ताईतवाले यांनी सांगितले की,वैजापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व अवैध धंदे,
वाहतूक कोंडी,वाळू तस्करी,जुगार,व्यसने याला आळा घालण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करणार आहे.येणारी बकरी ईद हा सण शांततेत साजरा करावा, व शांतता ,सुव्यवस्था राखावी असे आवाहन ही त्यांनी केले.आपल्या अध्यक्षीय  समारोपात उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे यांनी उपस्थिती सर्व सदस्य यांना, बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर  या शहरातील  शांतता,बंधुता,व सामंजस्याने हा उत्सव साजरा करून मानवतेचे दर्शन घडवावे असे आवाहन केले.या उत्सवाच्या  निमित्ताने शहरातील सर्व जात,पात, धर्म,व पंथाच्या नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखून माणुसकी जपावी असे फुंदे यांनी आवाहन केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सदस्य धोंडीरामसिंह राजपूत यांनी बैठकीचा उद्धेश विशद करून नवीन नियुक्त पोलीस निरीक्षक सत्यजित ताईत-वाले याचे वैजापूर वासीयांच्या वतीने स्वागत केले.या समयी किराणा असोसिएशन चे अध्यक्ष वजेष्ठ
नागरिक  प्रकाश शेठ बोथरा, अखिल शेख,शहर- ए-, काझी हाफीजोद्दीन यांची पिठावर उपस्थितीती होती.दिनेश राजपूत,प्रेम राजपूत,अमोल राजपूत,गौरव धामणे,बाबा धुमाळ ,शमीम सौदागर, गौरव दौडे,ज्योती हंगे, धोंडीराम राजपूत ,सेवेकरी अकबर यांनी शहरातील समस्या व प्रश्न विशद केले. सुनीता साखरे, निशा गोरक्ष, काझी हाफ�
[03/06, 15:47] Thakur SIR: काझी हाफीजोद्दीन,सेवेकरी अकबर ,विजय त्रिभुवन ,श्री.धसे शेख यांनीही विधायक सूचना व शहराच्या आडी अडचणी विशद केल्या. या प्रसंगी हाजी इम्रान कुरेशी,अकिल कुरेशी,करीम मौलाना, इरफान कादरी, रवी पगारे, श्रीराम गायकवाड,सरपंच दौलत गायकवाड, रियाजुद्दीन शेख,काझी लईक इनामदार, धर्मेंद्र त्रिभुवन, निलेश पारख,शैलेश पोंदे,राजेंद्र जानराव,अमोल राजपूत,कचरू राजपूत,स,पो,नि, विजय देशमुख,यांच्या सह शहरातील मुस्लिम बांधव व समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते(फोटो कॅप्शन-नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतआले शांतता समिती बैठकीत संबोधित करतांना)
 

No comments:

Post a Comment