वैजापूरात श्री.विठ्ठल -रुख्मिणी मूर्ती व महादेव शिवलिंग -नंदी मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कलश मिरवणूक - Vaijapur News

Breaking

Friday, June 6, 2025

वैजापूरात श्री.विठ्ठल -रुख्मिणी मूर्ती व महादेव शिवलिंग -नंदी मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कलश मिरवणूक


वैजापूर ता,०६
येथील जुन्या स्टेट बँक रस्त्यावरील लाडवाणी गल्लीतील जुन्या श्री.विठ्ठल - रुख्मिणी मंदिरात  रविवार रोजी श्री.विठ्ठल-रुख्मिणी
मूर्ती व महादेव शिवलिंग नंदी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.त्या निमित्त  शुक्रवार(ता,०६)रोजी सकाळी दहा वाजता शहरातून या मुर्त्यांची कलश मिरवणूक काढण्यात आली.त्या नंतर या मंदिरात जागेची महापूजा ही करण्यात आली.या प्रसंगी माजी नगरसेवक रामदास टेके, मुकुंद शेठ दाभाडे,सुहास सोंनदे, सेवा निवृत्त मंडळ अधिकारी अशोक आप्पा पवार खंडाळकर,समाजकार्यकर्ते  व जेष्ठ नागरिक धोंडीरामसिंह राजपूत,जीवन राजपूत,दिनेश घोलप,धीरज वर्मा,महेश अशोकराव डांगरे,शीतल रोजेकर,विशाल टेके,अक्षय टेके,सुरेश टेके,विलास रामैय्या,योगेश वर्मा,शुभम लाडवाणी ,प्रशात खडमकर,यांच्या सह महिला व पुरुष भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कलश मिरवणूकित वैद्यनाथ  डमरू दल, व कदम बाबा भजनी मंडळ यांनी सहभाग नोंदविला.(फोटो कॅप्शन-श्री. विठ्ठल-रुख्मिनी व महादेव शिवलिंग मुर्ती,कलश धारी महिला)

No comments:

Post a Comment