वैजापुरात "ईद-उल-अजहा"(बकरी ईद)निमित्त ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज - Vaijapur News

Breaking

Saturday, June 7, 2025

वैजापुरात "ईद-उल-अजहा"(बकरी ईद)निमित्त ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज

वैजापूर ता,०७
शहर व परिसरातील बिविध  मस्जिद मध्ये "ईद-उल-अजहा"(बकरी- ईद)निमित्त शनिवार(ता,०७)रोजी नमाज अदा करण्यात येऊन,  बकरी ईद च्या शुभेच्छा प्रदान करून "बकरी-ईद" साजरी करण्यात आली.मुख्य नमाज चांडगाव रस्त्यावरील ईद गाह मैदानावर सकाळी साडे- आठ  वाजता सामूहिक रित्या अदा करण्यात आली.मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी माजी नगराध्यक्ष व जिल्हा बँक संचालक डॉ.दिनेश परदेशी,
उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे,पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले,समाजसेवक धोंडीरामसिंह राजपूत ,यांची या मैदानावर विशेष उपस्थिती होती. नमाज संपल्यानंतर त्यांनी सर्वांना बकरी ईद च्या शुभेच्छा दिल्या .यात प्रामुख्याने उपनगराध्यक्ष साबेरखान,माजी उपनगराध्यक्ष मस्जिद कुरेशी,अखिल शेख,काझी हाफीजोद्दीन,राजू काझी,
हिकमत उल्ला,कयुम शेठ सौदागर,आमिरअली, काझी
लईक इनामदार,ऍड राफे हसन,अकबर कादरी,रियाजुदन शेख,अल्ताफ बाबा,युनूस देशमुख, हाजी इम्रान कुरेशी, माजी नगरसेवक महंमद नूर,मान्सूरअली, फैसल यांच्यासह सर्वांना ईद मुबारक देण्यात आली.पोलिसांकडुन शहरभर विविध  स्थळी व ईद गाह मैदानावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता,स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे ,रमेश  त्रिभुवन  यांनी सहभाग नोंदविला.(फोटो कॅप्शन-डॉ, दिनेश परदेशी, पोलीस अधिकारी ताईतवाले व धोंडीराम राजपूत मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतांना)

No comments:

Post a Comment