जीवनातील उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून निसर्ग पालन ही करासेवा निवृत्त शिक्षणाधिकारी -धोंडीरामसिंह राजपूत - Vaijapur News

Breaking

Saturday, June 14, 2025

जीवनातील उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करून निसर्ग पालन ही करासेवा निवृत्त शिक्षणाधिकारी -धोंडीरामसिंह राजपूत

वैजापूर ता,१४
विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील सर्वोच्च ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करून जीवनाचे ध्येय साध्य करावे हे करीत असतानाच निसर्ग समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करावे,प्रदूषण टाळावे स्वच्छता पाळावी असे आवाहन सेवा निवृत्त शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत यांनी शनिवार(ता,१४)रोजी तालुक्यातील शिवूर येथील युवा कॉम्प्युटर अकॅडमी यांच्या वतीने आयोजित गुणवंत व यशवंत विद्यार्थी गुण गौरव,व प्रमाणपत्र वितरण तसेच एक हजार वृक्ष रोपटी वाटप
कार्यक्रमात राजपूत बोलत होते. ते पुढे म्हणाले की,जीवनातील यश प्राप्ती साठी युवा कॉम्पुटर अकॅडमी  च्या माध्यमातून मिळालेले विविध ज्ञान व कौशल्य सहाय्यभूत ठरू शकतात. या अकॅडमी चे संचालक समाधान जगन्नाथ जाधव व सौ .सरला समाधान जाधव या दाम्पत्याने एक हजार रोपटी आणून या एक हजार विद्यार्थ्यांना ती धोंडीरामसिंह राजपूत यांच्यां हस्ते वाटप करून निसर्ग संगोपन करण्याचे आवाहन केले.या प्रसंगी सर्व प्रथम हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 
मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रास्ताविक व सूत्र संचलन अकॅडमी चे प्रमुख समाधान जाधव यांनी केले.या प्रसंगी हभप भोपळे महाराज,प्रा,शेखर देशमुख, साहित्यिक संजय जाधव, कैलास जाधव,अनिल भोसले,बाळा पा,जाधव,सुशील जाधव,सुनील पैठण पगारे, मच्छिन्द्र जाधव,यांची प्रमुख उपस्थिती होतो. अमृता आव्हाळे, खुशी तुपे,ऋतूजा तुपे,निखिल सामृत यांनी मनोगत व्यक्त केले.सदरील  युवा कॉम्पुटर सेवा केंद्र गेल्या१२वर्षापासून अखंडितपणे चालू असून या केंद्राच्या माध्यमातून विविध क्षेत्रात गुणवंत  विद्यार्थी व विदयार्थीनी यांनी आपले करिअर आरंभ केले आहे.समाधान जाधव व सरला जाधव या दाम्पत्यांनी शिवूर पंचक्रोशीतील हजारो विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे ज्ञान-कौशल्ये व माहिती देऊन व शिकवून त्यांचे करिअर घडविले आहे.ग्रामीण भागातील मुलां-मुलींचे उज्वल भवितव्य घडविणारे हे एकमेव केंद्र आहे असे शेवटी धोंडीराम राजपूत यांनी विशद करून
या दाम्पत्याच्या या अद्वितीय कार्याचे तोंड भरून
कौतुक केले आहे .शेवटी शेखर देशमुख यांनी समारोप केला(फोटो कॅप्शन-गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांना एक हजार रोपटी वाटप करून ती जगविण्याचा संकल्प करून घेतांना धोंडीरामसिंह राजपूत, समाधान व सरला जाधव व विद्यार्थी)

No comments:

Post a Comment