सेवाभारती देवगिरी प्रांत,फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प वैजापूर यांच्यावतीने येथील जि.प.प्रा.शाळा भायगाव कें.आघुर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा अतिशय उत्साहात करण्यात आला.
या योग दिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख प्रशिक्षक म्हणून अखिल भारतीय योगशिक्षक महासंघाच्या सदस्य असलेल्या,प्रसिद्ध योगशिक्षिका व सेवाभारती वैजापूर जिल्हा उपाध्यक्ष संतोषी भालेराव या लाभल्या.त्यांच्या सहकारी असलेले कार्तिकी बनकर,अनुष्का इंगळे या युवतींनी मिळून शाळेत विद्यार्थ्यांना योग दिनाचे धडे देण्यात आले.
या प्रसंगी भालेराव यांनी योग दिनाचे महत्त्व, नित्ययोग करण्याचे फायदे सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात पूरक हालचाली, सूक्ष्म व्यायाम घेऊन करण्यात आली.विविध योगासने, सूर्यनमस्कार, संगीतमय योगासने रिदमिक योग(योग नृत्य प्रकार)प्राणायाम यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि सर्वांना करायला लावले. सर्व शिक्षक-शिक्षिका यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे योग केला.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.शिवाजी डुकरे सर, शाळेतील सर्व शिक्षक शिक्षक वृंद,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण ठोंबरे विद्यार्थ्यांचे पालक,रा.स्व.संघ शिऊर तालुका कार्यवाह बाबासाहेबजी बोडखे, हे उपस्थित होते.मुख्याध्यापकांनी शाळेच्या वतीने आभार प्रदर्शन केले.शाळेचे शिक्षक श्री. भीमाशंकर तांबे सर यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी प्रकल्प शिक्षक आकाश चौतमल यांनी विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्पाची माहिती सांगून शाळेकडून लाभलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. या कार्यक्रमाला ११० मुले आणि १३२ मुली असे मिळून एकूण १४२ विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment