वैजापूरतील व्यापारी, नागरिक व,हॉटेल चालक, गृहिणी यांनी केर -कचरा घंटा गाडीत टाकावा आवाहन - Vaijapur News

Breaking

Friday, July 18, 2025

वैजापूरतील व्यापारी, नागरिक व,हॉटेल चालक, गृहिणी यांनी केर -कचरा घंटा गाडीत टाकावा आवाहन

वैजापूर ता,१८
पालिकेचे मुख्याधिकारी व प्रशासक पदाची सूत्र स्वीकारल्या पासून भागवत बिघोत (राजपूत)व त्यांचे स्वच्छता विभागाचे कर्मचारी वैजापूर शहराच्या स्वच्छतेसाठी रात्रंदिवस झटत आहेत.शुक्रवार (ता,१८)रोजी भागवत बिघोत यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे स्वच्छता दूत, धोंडीरामसिंह राजपूत व स्वच्छता विभागाचे वाल्मिक शेटे व प्रमोद निकाळे यांनी दवंडी देत शहरातील व्यापारी, नागरिक,हॉटेल मालक, गृहिणी यांना निवेदन करतांना आवाहन केले की,व्यापारी, नागरिक,हॉटेल चालक व गृहिणी यांनी केर कचरा रस्त्यावर ,किंवा गटारीत न फेकता तो घंटा
गाडीत टाकुन शहर--- स्वच्छ ,सुंदर व निरोगी ठेवण्यासाठी सहकार्य करावे.स्वच्छता दूत धोंडीराम राजपूत यांनी शहर वासीयांना शहर स्वच्छ, निर्मळ ठेवण्याचे आवाहन केले."येता दारी घंटा गाडी--त्यात टाका कचरा काडी",स्वछ व निर्मळ शहर  ठेऊ या-आरोग्यदायी  जीवन जगू या,अशी घोष वाक्य उद- घोषित करून शहर स्वछता ठेवा ,असे आवाहन केले नागरिकांनी शहर स्वच्छतेसाठी . सहकार्य करण्याचे आवाहन केले.या प्रसंगी स्वच्छता विभागाचे रमेश त्रिभुवन ,चालक खान,आस्वले यांनी सहभाग नोंदविला.(फोटो कॅप्शन-कचरा घंटागाडीतच टाकावा असे आवाहन करताना  धोंडीराम राजपुत,प्रमोद निकाळे, वाल्मिकी शेटे व ईतर)
 

No comments:

Post a Comment