भगवान परमात्मा नामस्मरणाने सर्व पापांचे क्षालन होते-हभप ज्ञानेश्वर महाराज मधाने - Vaijapur News

Breaking

Friday, July 18, 2025

भगवान परमात्मा नामस्मरणाने सर्व पापांचे क्षालन होते-हभप ज्ञानेश्वर महाराज मधाने

वैजापूर ता,२०
समाजातील ज्या व्यक्तीकडून काही चुका किंवा अधर्म
कार्य झालेले असेल तर त्या व्यक्तीने भगवान परमात्मा
नामस्मरण केल्यास व अशी अधर्म कार्य पुन्हा करणार नाही अशी क्षमा याचना केल्यास त्याच्या जीवनातील
सर्व पापांचे क्षालन होते, असे अमृत वचन शुक्रवार(ता,१८)रोजी हभप ज्ञानेश्वर महाराज मधाने
यांनी केले.ते संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ७२९व्या पुण्यतिथी निमित्त व संत नामदेव महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आयोजित  कीर्तन सोहळ्यात  माळी गल्ली येथील संत शिरोमणी मंदीर समोरील कार्यक्रमात कीर्तन करीत होते. ते पुढे म्हणाले की,संत शिरोमणी सावता महाराज यांना शेतीचे कष्ट करीत असताना, त्या काबाड कष्टत देवाचे दर्शन झाले,त्यांची पांडुरंग भक्ती अगाध आहे.या प्रसंगी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.संत सावता मंदीर आनंदनगर व संत सावता महाराज मंदिर माळी गल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन्ही मंदिरात काकडा आरती, हरिपाठ, श्रीमद भागवत कथा,कीर्तन असे कार्यक्रम चालू आहेत.या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत,नगरसेविका शोभाबाई भुजबळ,सुमनबाई गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.आयोजक सजनराव गायकवाड,गौतम गायकवाड, रतीलाल गायकवाड व समिती सदस्य ज्ञानेश्वर पवार,सीता मावशी गायकवाड, जिजाबाई गायकवाड, सुमन आंबेकर,सत्यभामा बनकर, फकिरा
गायकवाड सहभाग नोंदवीत आहेत.(फोटो कॅप्शन हभप ज्ञानेश्वर महाराज मधाने कीर्तन करतांना)

No comments:

Post a Comment