धोंडीरामसिंह राजपूत लिखित"तगादा"या कथा संग्रहाला राज्य स्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार - Vaijapur News

Breaking

Sunday, July 20, 2025

धोंडीरामसिंह राजपूत लिखित"तगादा"या कथा संग्रहाला राज्य स्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार

वैजापूर ता,२१
महाजन पब्लिशिंग हाऊस ,पुणे यांनी प्रकाशित केलेल्या   लेखक धोंडीरामसिंह राजपूत(वैजापूर) यांच्या",तगादा" या  शेतकरी जीवनाच्या व्यथा व कथा
दर्शविणाऱ्या कथा संग्रहाला राज्य स्तरावरील सर्वोत्कृष्ट साहित्य पुरस्कार बारामती या ठिकाणी  आयोजित  राज्य स्तरीय साहित्य संमेलनात रविवार(ता,२०)रोजी बारामती येथे प्रदान करण्यात आला.मराठी साहित्य प्रज्ञा मंच बारामती यांनी हे संमेलन भरविले होते.उदघाटक ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य समेलनाचे अध्यक्ष  श्रीपाल सबनीस होते तर अध्यक्ष  जेष्ठ साहित्यिक व लेखक
डॉ.शैलेंद्र भणगे होते.तसेच  राष्ट्रपती  पारितोषिक विजेते जेष्ठ कवी सीताराम नरके,बालगंधर्व पुरस्कार विजेते किरण गुजर,यांचीही उपस्थिती होती.प्रथम सकाळी ग्रंथ दिंडी काढण्यात आली.श्रीपाल सबनीस
म्हणाले की,"साहित्याला जात,पात, धर्म,पंथ वाद नसतो,साहित्य संस्कृतीत धर्मनिरपेक्षता हवी,या विश्वातील मानवतेला आकार देण्याचे कार्य साहित्यिकांनी करावे असे आवाहन त्यांनी राज्यभरातून  संमेलनात आलेल्या साहित्यिकाना केले.या संमेलनात विविध विषयांवर लिखाण करणाऱ्या साहित्यिकांना त्यांच्या सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मितीबद्धल पुरस्कार देण्यात आले.या साहित्य संमेलनात कवी संमेलन ही रंगले.परिसंवाद मारुती चित्तमपल्ली यांच्या निसर्ग प्रेम व साहित्यावर होता,डॉ,महेश गायकवाड यांनी उपस्थिताना महत्वपूर्ण माहिती दिली, सहभागहोता डॉ,आनंदा गांगुर्डे व संजय
खिल्लारे यांचा. सूत्र संचलन सलीम बागवान यांनी केले. प्रास्ताविक आजोजिका सौ.प्रज्ञा ढमाळ यांनी केले,त्यांचा जीवन गाणे हा कविता संग्रह ही यावेळी
प्रकाशित करण्यात आला.सुरेश ढमाळ,किरणसिह राजपूत,जयसिंह परदेशी, प्रतिभा विभूते,मानसी पठारे यांनी सहभाग नोंदविला.(फोटो कॅप्शन-धोंडीरामसिंह राजपूत यांच्या "तगादा"" कथासंग्रहाला पुरस्कार प्रदान करतांना मान्यवर)
 
 

No comments:

Post a Comment